वनटान्गिया’तील दाेन लाख गाै-दिव्यांचा महाेत्सव

    19-Oct-2021   
Total Views |
 
 
कृषिउत्पादक संघटनांकडून वनवासी महिलांना शेणाचे दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात ब्रह्मकृषि बायाे एनर्जी फार्मर प्राेड्यूसर कंपनीने पुढाकार घेतला आहे. (भाग :1534)
 
 

cow_1  H x W: 0 
काही वर्षांपूर्वी गाईच्या शेणाचे दिवे लावण्याविषयी प्रचार करावा लागायचा पण आता अनेक गावात ‘गाै-दीप महाेत्सव’ सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी शेणाने बनविलेले दिवेही मिळू लागले आहेत.गाै-दिव्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी हाेताे. यावर्षी जागृती संघटनांनी दहा काेटी दिव्यांचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, हरियाणा,प. बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीस गड या भागात गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक यांचा प्रचार झाला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये दूध व अन्य गाेउत्पादनांचा प्रचार वेग घेताे आहे. येथील ‘वनटान्गिया’ गावात दाेन लाख गाै-दिवे लावण्याचा संकल्प साेडला आहे. त्याची तयारी म्हणून प्रत्येक माेहल्ल्यात एक एक हजार दिवे सध्या राेज लावण्यात येत आहेत.
 
कृषिउत्पादक संघटनांकडून वनवासी महिलांना शेणाचे दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात ब्रह्मकृषि बायाे एनर्जी फंर्मर प्राेड्यूसर कंपनीने पुढाकार घेतला आहे. एका भागात दाेन लाख दिवे लावणे व अन्य ठिकाणी तसे दिवे विकणे असा हा दुहेरी कार्यक्रम आहे. या निमित्ताने एकत्र येणाऱ्या महिलांसाठी गाेआधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या माेहिमेसाठी माेठ्या प्रमाणावर शेण गाेळा करणे, तीन किलाे शेणात विशिष्ट प्रकारची माती मिसळून त्याच्या आधारे या पणत्या तयार केल्या जातात. पणत्यांखेरीजही अनेक प्रकारचे दिवे तयार हाेत आहेत.याच समितीच्या माध्यमातून साबण, धूपकांडी, दंतमंजन, छाेटी छाेटी औषधे अशी अन्य गाेउत्पादनेही तयार केली जाणार आहेत. महिलांचा हा बचत गट स्वयंपूर्ण व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. गाईच्या दिव्यांचे म्हणजे पणत्यांचे वैशिष्ट्य असे असते की, त्यात घातलेले दिव्यासाठीचे तेल बाहेर ओघळत नाही.चांगले वातावरण तयार करण्यासाठी हा दिवा अतिशय उपयाेगी पडताे.