लाेकमान्यांच्या काळापासूनच काँग्रेसमध्ये ‘गाय’ चिन्हाचा आग्रह

    15-Oct-2021   
Total Views |
 
 

cow_1  H x W: 0 
 
लाेकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना प्रथम काँग्रेसच्या चळवळीचा मध्यबिंदू गाेवंश हाेता. या देशाच्या सर्वांगीण विकासाला गाेवंशच उपयाेगी पडेल, असे काँग्रेसच्या प्रत्येक सभेमधून आणि अधिवेशनातूनही मांडले जायचे. (भाग :1532) महात्मा गांधी इ.सन 1915 मध्ये दक्षिण आि्रकेतून भारतात आले आणि त्यांनी लाेकमान्य टिळक यांच्या इ.सन 1920च्या निधनानंतर काँग्रेसच्या चळवळीचे नियंत्रण आपल्या हाती घेतले. महात्मा गांधी यांचा गाेवंश विकासावर विश्वास हाेता आणि स्वातंत्र्यचळवळीपेक्षाही मी गाेरक्षण आणि गाेआधारित शेतीला महत्त्व देईन, असे म्हणून दाखवत असत. पण त्याच वेळी काँग्रेसमध्ये ‘चरखा’ या चिन्हाची चर्चा सुरू झाली. तरीही इ.सन 1942 च्या भारत छाेडाे आंदाेलनानंतर महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गाेवंश असावे, असे बाेलून दाखविले. त्यानुसार पुढे ते झालेही प्रत्यक्ष काँग्रेसच्या पहिल्या तेहतीस वर्षांच्या सत्तेमध्ये गाेवंशावर आधारितच निवडणूक चिन्ह हाेते. पण प्रत्यक्षात गाेवंश रक्षणाच्या विराेधात आणि अप्रत्यक्षपणे गाेमांसाच्या निर्यातीस चालना असेच हाेते.
 
सात वर्षापूर्वी भाजपाचे सरकार केंद्रात आणि काही राज्यात सत्तेवर आल्यावर त्यांनी गाेविज्ञानाला चालना देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रत्येक राज्यात गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक यांचे प्रयाेग सुरू झाले आहेत. सध्या देशात दहा लाख काेटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे रासायनिक खत शेतीसाठी वापरले जाते.त्यातील बराच माेठा वाटा विदेशी चलनात असताे. रासायनिक खतासाठी एकरी पंधरा हजार ते तीस हजार रुपयांचे रासायनिक खत लागत. पण तेवढ्याच शेतीसाठी गाेआधारित शेतीने घरची गाय असेल तर अगदीच नाममात्र खर्चाने तेवढीच शेती हाेते. हा प्रयाेग आता हळूहळू भारतीय शेतकरी करू लागले आहेत.यातील स्वागतार्ह विराेधाभास म्हणजे काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये त्यात एक पाऊल पुढे आहेत. छत्तीसगड सरकारने गेल्या अडीच वर्षात राज्यात निर्माण हाेणारे सारे गायीचे शेण खरेदी करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचे खत करून राज्यातील प्रत्येक शेत हे गाेआधारित जैविक शेतीने संपन्न करण्याचे ठरविले आहे, तशी सुरुवातही झाली आहे.राजस्थानमध्येही काँग्रेसचे सरकार आहे, तेथेही गाेशाळांसाठी अनुदान आणि त्यासारख्या याेजना स्वीकारल्या आहेत.