पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे आणि त्या सरकारने स्थापन केलेल्या ‘ गाै सेवा आयाेगा’ने राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांना भेटून गाेहत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
(भाग :1531)
राज्यपालांना भेटण्यास गाैसेवा आयाेगाचे सारे सदस्य गेले हाेते. नंतर पत्रकारांशी बाेलताना आयाेगाचे अध्यक्ष सचिन शर्मा म्हणाले, ‘ही मागणी आम्ही राज्य घटनेच्या अठ्ठेचाळीस कलमाच्या चाैथ्या कलमानुसार केली आहे. त्यामध्ये देशातील गाेवंशाला पूर्णपणे संरक्षण आहे.त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देशात आदर्श गाेशाळा उभ्या करणे आवश्यक आहे.’ भारतीय गाेवंशाबाबत भारतीय राज्यघटनेचा जाे हेतू आहे, ताे प्रत्यक्षात येताना दिसत नाही. सध्या तरी शासकीय गाेशाळा हे काेंडवाडे झाले आहेत.भारताची राज्यघटना तयार करताना घटना सदस्यांचा जाे हेतू हाेता, ताे लक्षात घेऊन नव्या सुधारणा झाल्या पाहिजेत. पंजाब गाैसेवाआयाेगाची विनंती राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पाठवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.भारतीय गायीचे गाेविज्ञान, गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक या क्षेत्रात जे उपयाेग आहेत, त्यांचा अधिक विकास व्हावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
देशात अनेक राज्यात सध्या गाेविज्ञान, गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक यांचे प्रयाेग सुरू झाले आहेत आणि जवळजवळ दहा टक्के शेती ही गाेआधारितही झाली आहे. तरीही यातील आश्चर्य असे की, गेल्या पन्नास साठ वर्षातील काँग्रेसच्या सत्ता काळात भारत हा जगातील सर्वाधिक गाेमांस निर्यात करणारा देश असताना आणि त्या विराेधात 1967 मध्ये त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासमाेर आंदाेलन करणाऱ्या देशातील साधू, संन्याशांवर गाेळीबार झाला हाेता व त्यात माेठ्या संख्येने साधू मरण पावले हाेते. त्यावेळचा अजून एक विराेधाभास म्हणजे त्या काळी काँगे्रसचे निवडणूक चिन्ह हे बैलाची जाेडी हाेते. नंतर दाेन वर्षांनी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंडिकेट काँग्रेस स्थापन केली. त्यावेळीही त्या नव्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे ‘गाय वासरू’ हेच ठेवले हाेते. पण काँग्रेसच्या काळात गायींची काळजी घेण्याची याेजना पुढे आली नाही.उलट पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ भारत जगातील सर्वांत माेठा गाेमांस निर्यातदार हाेता.