तिरूपती देवस्थानाने गाेवंश विकास आणि गाेविज्ञान विकास यासाठी एका पाठाेपाठ माेठे निर्णय घ्यायला आरंभ केला आहे. (भाग :1529)
साऱ्या आयुर्वेद महाविद्यालयात ‘गाेवैद्यक’ हा स्वतंत्र विषय सुरू झाल्याने त्यासाठी त्यांनी माेठा विभाग उघडला आहे. आजपर्यंंत गाेमूत्र आणि शेण यांचा औषधाला कसा वापर कसा करायचा, याची माहिती दिली जायची.पण पंचगव्य हा स्वतंत्र अभ्यासक्रम नव्हता. प्रकृतीच्या दैनंदिन स्वास्थ्य रक्षणापासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीपर्यंत त्याचा उपयाेग हाेताे आणि पंचगव्यामुळे प्रथम काेणत्याही व्याधीतील वेदना कमी हाेते. हे पाहून केंद्रीय आयुष मंत्रालयाने गाेवैद्यक असा स्वतंत्र विषय आयुर्वेदात आणला आहे. तिरुमती तिरुमला देवस्थानाने यासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. भारतीय ‘गाेवंश’ हा राष्ट्रीय पशु म्हणून केंद्र सरकारने स्वीकार करावा, म्हणून त्यांनी देशव्यापी जागृती माेहीम सुरू केली आहे. त्यामध्ये माेठमाेठे मेळावे, प्रदर्शने, पदयात्रा आणि आवश्यक त्या ठिकाणी निदर्शने सुद्धा आयाेजित केली जात आहेत.याच संस्थेच्या दाेन माेहिमा नव्याने सुरू झाल्या आहेत, त्या म्हणजे श्रीबालाजींच्या दर्शनाला येणाऱ्यांना गाेप्रदक्षिणा आणि गाेप्रदर्शन दाखवणे आवश्यक केले आहे.
त्यासाठी चार एकर जागेमध्ये स्वतंत्र ’सप्त गाेप्रदक्षिणाशाळा’ उभी करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमाेहन रेड्डी हे करणार आहेत. या प्रदक्षिणा मार्गावर गाेभक्ती, गाेविज्ञान, गाेकृषी, गाेवैद्यक यांची माहिती लावण्यात येणार आहे. याला जाेडून अजून एक उपक्रम सुरू झाला आहे ताे म्हणजे ‘नवनीत सेवा’. तिरुपती -तिरुमला देवस्थानाअंतर्गत मंदिरांची संख्या माेठी आहे. सध्या तेथे दक्षिणेतील पाच राज्यातून देणाऱ्या भक्तांची संख्या चाळीस हजार आहे. काेविडपूर्व काळात ती 75 हजार हाेती. पारंपरिक पद्धतीने म्हणजे माेठ्या डेऱ्यात दही ठेवून माणसापेक्षाही अधिक उंचीची रवी त्यात घालून आणि त्याला दाेरी गुंडाळून दही घुसळणे. याखेरीज एका गायीच्या वजनाएवढी सामग्री, की ज्यात वैरण, तांदूळ, अन्य धान्य किंवा त्यासारख्या बाबी देणे. तिरुपती देवस्थानातील ‘दान’ हा विषय अनेक शतकापासून सर्वज्ञात आहे.दान देणाऱ्याचे नाव जाहीर न हाेऊ देता हजाराे रुपये, लाखाे रुपये आणि काेटी काेटी रुपये दान करणाऱ्यांची संख्या माेठी आहे.