गेल्या सहा सात वर्षांत गाेवंश रक्षणाबाबत एक नवी जागृती आल्याने प्रत्येक गाय, बैल, वासरू वाचवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करणारांची संख्या वाढली आहे. (भाग :1518)
म्हातारी गाय की जी दूधही देऊ शकत नाही आणि जाे म्हातारा बैल उभाही राहू शकत नाही, असा गाेवंश फक्त वैरण खाण्यापेक्षा अधिक कांही करू शकत नाही, असा तर्क प्रसारमाध्यमापासून, संसदेपर्यंत आणि प्रशासनापासून न्यायपालिकेपर्यंत सर्वत्र मांडला जाताे. माेकाट गाेवंशाचा रस्त्यात वाहतुकीला अडचण हाेते. अशा जनावरांचा खर्च शेतकऱ्यांनही परवडत नाही, असे तर्क गेली अनेक दशके मांडले जात आहेत. पण, एका भाकड गाईच्या गाेमूत्र आणि शेण यांच्या आधारे पंचवीस तीस एकर बागाईती शेतीच्या खताची व्यवस्था हाेऊ शकते, ही बाब प्रयाेगाने आणि प्रत्यक्ष वापराने माेठ्या प्रमाणावर सिद्ध झाल्याने काेणती शंका राहात नाही.
ज्या घटकाच्या आधारे देश कृषीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही माेठा टप्पा गाठू शकताे, ताे घटकच येथून नामशेष करण्याचा नियाेजनपूर्वक प्रयत्न सुरू केला गेला.गाेआधारित शेतीप्रमाणेच अशी दहा क्षेत्रे आहेत ज्यांच्यामुळे देशाचे दहा बारा लाख काेटी रुपये वाचू शकतील. हा आकडा अतिशयाेक्तपूर्ण वाटेल. अनेक क्षेत्राबाबत या बाबी स्पष्ट हाेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेेंगुर्ले येथील एक आर्किटेक्ट अजित परब यांनी गाेमूत्र आणि शेण यांच्यात घरगुती वापराचे कांही घटकांचा वापर करूनच शहरे, खेडी, महापालिका येथील विरघळणाऱ्या साऱ्या घटकांचे चांगल्या पाण्यात रूपांतर करण्याचे प्रयाेग केले, त्याला चांगले यश आहे. हे प्रयाेग त्यांनी ‘जीवनामृत’ या द्रावणातून केले.
हरियानातील डाॅ शिवदर्शन मलिक यांनी शेणाचा समावेश असलेली वीट तयार केली आहे. सध्याच्या विटेऐवजी ती वीट वापरली तर घरबांधणीखर्च निम्मा हाेताे. देशाला दिशा देणारे असे सारे प्रयाेग प्रथम छाेटेच असतात.पण प्रत्येकाने त्यात सहभाग घेतला की ते राष्ट्रीय हाेतात आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा परिणाम दिसू लागला की, ते जागतिक हाेतात. त्यासाठी घरातील थाेडी जमीन शेणाने सारवणे यापासून ते घराभाेवतालच्या लावलेल्या कुंडयातील किंवा अंगणातील झाडावर दर आठवड्याला गाेमूत्रपाणी फवारणे हाही माेठा राष्ट्रीय प्रयाेग आहे हे विसरून चालणार नाही. गाेमूत्र ते मिळाले नाही तर रामदेवबाबाच्या दुकानात गाेमूत्र अर्क मिळताे ताे वापरला तरी चालताे.