आजोबांची खेळणी

    04-May-2020   
Total Views |

Ajoba_1  H x W:


आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.

दादा दिसेनासा झाल्यावर पिनू कासावीस होते. 'दादा, दादा' असं ओरडत दादा गेल्याच्या दिशेनं दोन्ही हात पसरते, आई समजावते, 'दादा पुन्हा घसरत येणार, तुला टाळी देणार आहेफ तेवढ्यात पराक्रमी दादा दिसताच पिनूच्या चेहऱ्यावर हसणं उमलतं. ती 'दादा, दादा' म्हणून ओरडते. मोकाशी आजोबांचा चेहरा सांगताना ताजातवाना झालेला असतो. त्यांच्या दाढीचे पांढरे खुंट चांदीसारखे चमकत होते. ऐकणाऱ्या ओकांचे कानही सुखावले होते, जणू ते झऱ्याच्या झुळझुळ आवाजात न्हात होते. गोंधळेकर सांगू लागले, 'दुसरा एक आठ वर्षांचा दुसरा दादा रिंगणघोड्यावर बसला होता. दादा जमिनीला पायानं रेटा देऊन रिंगणचक्र जोरानं पळवत होता. दादाची छोटी बहीण बेबी, 'मला बसायचंय, मला बसायचंय' म्हणून आईच्या खांद्यावरून हातपाय झाडत होती.

मोकाशी पुढचा भाग सांगू लागले, 'दादाला बेबीचं दु:ख बघवेना. त्यांन फिरतं रिंगण पाय टेकवून थांबवलं. तो आईला म्हणाला, आई, बेबीला बसव ना घोड्यावर. आई म्हणाली ती कशी बसेल? तिला घोड्याचे कान घट्ट थोडेच धरता येतात? ती पडेल. दादा म्हणाला, 'बेबी घोड्यावर बसेल. मी तिला शिकवीन. मी घोड्यावर बसणार नाही. मी घोड्याबरोबर जमिनीवर सावकाश पळेन. एका हातानं बेबीला आधार देईन. आई, तू चक्र हातानं हळू फिरव.' गोंधळेकर मध्ये घुसून पुढचं सांगू लागले, 'ओक, गंमत तर पुढंच आहे. बेबी घोड्यावर बसली. तिचा चेहरा आनंदानं डवरला होता. आई रिंगण हळू फिरवत होती. दादानं प्रेमानं बेबीला छान आधार दिला होता, तेवढ्यात काय झालं कोणास ठाऊक! जमिनीवरचा दादा पडला, घोड्यावरची बेबी सुरक्षित होती! आई दादावर ओरडली. घोड्यावरून खाली उतरलेली बेबी आईला म्हणाली, 'दादाला रागवू नकोस. त्यानं मला घोड्यावर बसवलं. माझ्याकरिता तो पडला. तू माझ्यावर रागव, दादावर नको.' आईनं दोघांनाही जवळ घेऊन प्रेमांन कवटाळलं. सांगताना मोकाशींचा कंठ दाटून आला. 


गोंधळेकर-मोकाशी यांचं संयुक्त निवेदन ओकांच्या मनाला भिजवून गेलं. गोंधळेकर व मोकाशी काळजीपूर्वक, तन्मयतेनं बाळलीला पाहात असतात. ओकांच्या मनात आलं, 'आपण केवढ्या आनंदाला वर्षांनुवर्षे मुकलो. आपणही भिंतवर गोंधळेकर व मोकाशी यांच्या जवळ बसतो. आपणही पाहत असतो; पण आपण निर्जीव हत्ती, घोडे पाहत असतो. गोंधळेकर व मोकाशी निरागस, प्रफुल्लित, हसरी, चैतन्यानं निथळणारी मुलं व बाळं पाहात असतात, त्यांचे किलकिलाट ऐकत असतात. आता पुढील बारा-पंधरा आठवडे, खेळण्यांचा हा बालविभाग मुका होणार. गोंधळेकर व मोकाशी यांना गलबलून येणं स्वाभाविक आहे.' ओकांनी अपराधी स्वरात कबुलीजबाब दिला, 'मोकाशी, सॉरी हं. तुमची बोच समजायला मला वेळ लागला. काही आठवडे आपणा साऱ्यांना खेळणारी बाळं दिसणार नाहीत. अरेरे!' ओकांचा रुमाल त्यांच्या डोळ्यांना चिकटला होता. 

गोंधळेकर म्हणाले, 'ओक, फक्त काही आठवड्यांचाच तर प्रश्न आहे. आपण नव्वदीपर्यंतत म्हणजे अजून सहा वर्षे सहज जगू. सहा वर्षांतले फक्त थोडे आठवडेच तर कोरडे जाणार! मोकाशींनी ओकांच्या खांद्यांना थोपटलं. 

बाळ मातेपुढे नाचे!
परब ओठ हलवत बागेत शिरत होते. 'ता' वरून ताकभात ताडण्याएवढा मी चाणाक्ष आहे. मी म्हणालो, 'परब, मोठ्यानं म्हणा, मतदबीरसे बिगडी हुई,' तकदीर बना ले...अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले' हे गीता दत्तचं स्फूर्ती देणारं गाणं माझं आवडतं आहे.' (क्रमश:)