दसरा आला आणि गेला

    14-May-2020   
Total Views |

Ajoba_1  H x W:
आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.


दसरा आला आणि गेला 


काड्याच्या टोकाला जायचं, नदीच्या पात्रातील खडकावर चढायचं आणि सेल्फी काढताना काय करायचं, तर तोल गमवायचा व जीव गमवायचा. सेल्फी काढू नका हे न बोलता, तुम्हाला न दुखवता, आजोबांना नातवांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्ही नातवंडं कपड्यांवर, बूट-चपलांवर, हॉटेलमध्ये, मॉलमध्ये, सिनेमांवर, चैनीपोटी किती पैसे उधळता? आम्हा आजोबांच्या अधू डोळ्यांनाही ते पाहवत नाही. वीज, पाणी, पैसा, वेळ यांचा निरर्थक वापर, उधळमाधळ, नासाडी हे पाप आहे; पण आम्ही आजोबा बोलणार नाही. आम्ही आजोबा मूक राहणार. तुम्ही आमचं ऐकत तर नाहीच; वरती काही स्वैर, आततायी प्रतिक्रिया देता की आम्ही आजोबा जन्मभर पश्चात्ताप करत बसतो! 
मोरू तुझ्या फोनमध्ये नेट, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप वगैरे सोयी आहेत का? त्यावर काही आलं की ते तुम्ही नातवंडं वाचता म्हणे. परब व ओक या माझ्या मित्रांना, त्यांच्या नातवंडांनी तुम्ही आउटडेटेड आहात, असं सांगितलं म्हणे. मोरू, मी यापुढे कोणत्याच दसऱ्याला तोंड उघडून, दसरा आला असं म्हणणार नाही. मोरूला आजोबांचं म्हणणं समजलं. त्याच्या मनात आजोबांविषयी आपार प्रेम दाटून आलं. तो अजोबांना म्हणाला, ठीक आहे; मी तुमचं म्हणणं माझ्या मित्रांपर्यंत पोचवतो. आजोबा, इस बात पर एक सेल्फी तो हो जाये! आजोबा, सेल्फी काढताना माझा आधार घ्या, तोल सांभाळा मी सेल्फी व्हॉट्सअ‍ॅपवर टाकणार आहे. जरा हसा. वेडात आजोबा तीन... ओक, परब व मोकाशी हे चौऱ्याएेंशी वयाचे तीन मित्र आजोबा खालील स्वरूपाच्या बातम्या वाचतात व ओक्साबोक्शी हळहळतात. 
(१) शाळेतील मुले मुलींवर बलात्कार म्हणजे रेप करतात व शेवटी त्यांना ठार मारून जाळतात.
(२) शाळेतील शिक्षक, कर्मचारी मुलींशी वावगं वर्तन करतात. अजाण मुली भेदरतात. 
(३) तरुण मित्र-मैत्रिणींचा कंपू पिकनिकला जातो. पिकनिक विचित्र वळण घेते व अखेर छेडछाड, रेप, खून असे घडते. 
(४) शाळकरी मुले प्रेम करतात. वडीलधाऱ्यांना त्यांचे प्रेम सहन होत नाही. घराण्याचा नावलौकिक जपण्यासाठी वडीलधारे कोवळ्या प्रेमिकांचा खून करतात.
(५) एक पुरुष एका स्त्रीला लग्नाचे आश्वासन देतो. दोघेही गुण्या गोविंदानं, वर्ष-दोन वर्ष लग्नावाचून राहतात. दोन वर्षांनंतर स्त्री पोलीस ठाण्यावर जाते आणि वचनभंगाची व रेपची तक्रार नोंदवते. काही वेळा स्त्री पंख्याला टांगून घेऊन आत्महत्या करते. तिनं चिठ्ठीत सविस्तरपणे सर्व नोंदविलेले असते. 
ओक आजोबा वैतागून म्हणाले, मला आजकाल अशा प्रकारच्या बातम्या वाचवत नाहीत, जगणे नको वाटते. परबांनी समजावलं, ओक, जगणं- मरणं हे परमेश्वरी इच्छेवर अवलंबून आहे. आपण पंधरा आजोबा एकत्र जमायचो व दोघांत एक कप चहा घ्यायचो. आता आपण तिघेच उरलो आहोत. आपली वेळ येईल तेव्हा आपण जाऊ. सध्या तरी दोन चहा तिघांत घेऊ. मोकाशी धीमेपणानं म्हणाले, आपण तिघे राहू का जाऊ. हा प्रश्न महत्त्वाचा नाही; आपल्या नातवंडांबाबतच्या या भयानक घटना थांबल्या पाहिजेत. त्याबाबत बोला. ओक म्हणाले, क्रम चुकल्यामुळे, अवकाळी या घटना घडतात. म्हणजे? परबांचा प्रश्न. सूर्यानं सकाळी उगवावं, कोवळं ऊन सांडावं, दुपारी तळपावं व संध्याकाळी परतावं हा क्रम आहे. सूर्य सकाळी तळपतो का? तसंच बाळानं लहानपणी रांगावं, विद्यार्थी असताना अभ्यास करावा, तरुणपणी पोटापाण्याची व्यवस्था झाल्यावर प्रेम करावं, लग्न करावं आणि आजोबा झाल्यावर थांबत थांबत चालावं किंवा चालताना अधूनमधून थांबावं, हा क्रम आहे. (क्रमश:)