आईबापांना समजून घ्या! (भाग २)

    05-Apr-2020   
Total Views |
parnt_1  H x W:

तुझी प्रकृती कशी आहे? अभ्यास कसा चालला आहे? वगैरे आम्ही विचारत असू. पण आम्ही मुख्यत्वे अभ्यास कसा चालला आहे? वगैरे आम्ही विचारत असू. पण आम्ही मुख्यत्वे अभ्यासाबाबत बोलत असू. आम्हाला अभ्यासाबाबतच बोलायचं आहे, हे उदयला नीट समजलं होतं. त्यामुळे उदय म्हणे, तुम्ही मला तुमच्या मालकीच्या फाइव्ह स्टार फ्लॅटमध्ये राहायला परवानगी दिली आहे. तुमच्या मेहरबानीवर मला सकाळ-संध्याकाळ पंचप्नवानांचे जेवण मिळत आहे! तुमच्या रोजच्या उपदेशांचे श्रवण मला केलेच पाहिजे. उदय उद्धटपणे तिरकस उत्तर देत आहे, हे आम्हाला समजत होतं. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की, आपण रोज १५ मिनिटं उदयचे छद्मी शब्द ऐकायचे.

हे सर्व केवळ आम्ही आईबाप आहोत म्हणून करत नव्हतो. जर आपण कठोरपणे वागलो, बोललो तर उदय रागापोटी आत्महत्या करेल, ही भीती आमच्या मनात होती. उदयने आत्महत्या केल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला समजून घ्यायला हवे होते, असे लेख आमच्या संबंधात वृत्तपत्रात छापून येतील या धास्तीपोटी! एक आशाही होती, रोज आपले आईबाप शांतपणे आपले उद्दाम बोल ऐकून घेतात, त्यांचे सांगणे आपल्या हिताचे आहे, आपली वर्तणूक योग्य नाही, आपण सुधारावे असेही एखादे वेळी उदयला वाटून जाईल.

आपली कोणतीही इच्छा उदयवर लादायची नाही, हे आम्ही आईबापांनी पक्के ठरवले होते. जेवणानंतरच्या संभाषणात, 'कॉलेजात जाऊन पदवी मिळवायलाच हवी असे नाही. तुला जर छोटा व्यवसाय करायचा असेल तर अशा व्यावसायिकाकडे तू मिळेल त्या पगारावर, बिनपगारीसुद्धा अनुभव घे' हेही आम्ही मृदू आवाजात सांगितले. आमच्या निवृत्तीनंतर आम्ही काय करू? उदयची घसरलेली गाडी थोडीफार मार्गावर आली तर आम्ही स्वत:लाभाग्यवान समजू. उदय जुगार खेळू लागला, दारू पिऊ लागला. मदारूसाठी पैसे नसतील तर हे घर विका, पुन्हा एका खोलीत जाफ असं दटावू लागला, मारू लागला तर आम्ही आत्महत्या करू. उदयने आम्हाला समजून घेतले होते. आम्हीच निवृत्तीनंतर निराश झालोफ असे लिहून ठेवू व मगच आत्महत्या करू. आमच्या आत्महत्यानंतर तज्ज्ञांचे लेख येतील, उदय ते मुळीच वाचणार नाही.

आपल्या आईवडिलांची आर्थिक स्थिती उत्तम असली तरीही उदयच्या वयाच्या विद्याथ्ङ्र्मांनी, आपण विद्यार्थी आहोत हे २४ तास ध्यानी ठेवले पाहिजे. काटकसर करणे, चैन टाळणे, निरोगी सवयी लावून घेणे, वेळेचा सदुपयोग करणे, उत्तम मित्र जोडणे, सतत काम करत राहणे, शिकणे, व्यायाम करणे, मनाची उंची वाढवणारे वाचन करणे अशा सवयी विद्यार्थीदशेत अंगी मुरल्या तर पुढे आयुष्य सफल होते. आपल्या मुलात वरील गुण यावेत म्हणून आईबाप तडफडतात. काळ विपरीत आला आहे. ममाता शत्रु: पिता वैरी येन बाल:न पाठित: ।रा;िफ म्हणजे मुलाला न शिकवणारे आईबाप मुलाचे वैरी होत, असे हे सुभाषित सांगते. आजकाल मुलाला अभ्यास कर, टीव्ही कमी पाहा सांगणारे आईबाप शत्रू ठरतात!

(क्रमश:)

- भा.ल. महाबळ