पतवंडांची ही पिढी कॉम्प्युटर- मोबाइल वापरण्यात खूप वेळ घालवते; नूडल्स-पिझ्झा खाते व कोल्ड्रिंक पिते. यासाठी आपण त्यांच्यावर संतापू नये. ती बुद्धीनं आपल्या वरचढ आहेत.फ ओकांचा स्वर कौतुकाचा होता. मला कौतुकाचा स्वर आवडला नाही. मी तिरकसपणे म्हणालो, मखरं आहे, पतवंडांना पहाटे उठणं म्हणजे काय माहीत नाही; सूर्यनमस्कार घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तूप, वरणभात खाणं त्यांच्या जिवावर येतं. मुख्य म्हणजे रात्री रामरक्षा न म्हणता ती टीव्हीपुढं बसतात. अशा पतवंडांची दृष्ट काढावी!फ माझ्या तिरकस स्वरात प्रचंड खरखर होती. मी पूर्णपणे पतवंडांच्या विरुद्ध आहे हे ओक आणि परब यांना जाणवलं.
मला शांत करत परब म्हणाले, मोकाशी, पिढीनुसार आवडी-निवडी बदलतात, आपण समजून घ्यायचं. मोकाशी , तुम्ही तूपवरणभात खाण्याबाबत शेरा मारलात; तरुणपणी आपण सारे हॉटेलात जाऊन इडली-वडा-डोसा हे पदार्थ खाल्ले! आपले पणजोबा हयात असते तर त्यांना आपले हे उडपी पदार्थ खाणं आवडलं असतं? ओक बोलले, मखाणं दूर ठेवा, त्यांना हॉटेलात पाय ठेवणंही आवडलं नसतं. मोकाशी, तुम्ही दिवसातून चार वेळा चहा घेता, पाचव्या वेळी कोणी दिला तर तोही तुम्ही घ्याल! तुमच्या पणजोबांनी यासाठी तुमची गय केली असती? मी सुज्ञपणे माघार घेतली. ओक व परब यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. पण मी थेट पराभव मान्य न करता प्रश्न टाकला, ओक, पतवंडं फार स्माट आहेत हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? ओक सांगू लागले, माझा पणतू चिनू फ्नत सहा वर्षांचा आहे. तो श्रीकृष्ण या देवाची कथा पणजीकडून ऐकतो. कृष्णजन्माची कथा ऐकताना तो म्हणाला, माई, तुझ्या गोष्टीतला कंस नुसता बलून आहे. मबलून म्हणजे काय? मी विचारलं. मबलून आहे म्हणजे मूर्ख! डो्नयात काही नाही, फ्नत हवा.
टाचणी लावला की फुगा फुटतो. ओकांनी मला नवी भाषा समजावून दिली. कंस क्रूर होता, मूर्ख थोडाच होता? मी ओकांना म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या चिनूला सवाल केला. ममोकाशी, माझ्या पत्नीनं चिनूला, देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल, हा कंसाला दिलेला इशारा पूर्व भागात सांगितला होता. म्हणून तर कंसानं आपली बहीण देवकी व तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात डांबलं होतं. बाळ जन्माला आलं रे आलं की कंस बाळाचा वध करायचा.ओक सांगू लागले.
(क्रमश:)