छड़ी रे छड़ी

    24-Apr-2020   
Total Views |
 
mnb_1  H x W: 0
 
तोल सांभाळताना हा सकाळच्या (१५-११-२०१९) आधारवड पुरवणीतील, श्रीमती संध्या गायकवाड यांचा लेख वाचला. लेखातील मुद्द्यांशी व सल्ल्याशी मी पूर्ण सहमत आहे. माझ्या हातातील काठी वर नाचवतच मी पाठिंबा व्यक्त केला असता; पण मग माझा तोल जाईल व मी पडेन! या भयापोटी काठीचा आधार न सोडता, मी पाठिंबा देतो. पुढच्या ७५-८० या आसपासच्या वयात तोल जाणे, पडणे, अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्टचर होणे, नंतर यशस्वी शस्त्रक्रिया होऊनही घरात अडकून पडणे, बाहेरचे हिंड्ने -फिरणे जवळ-जवळ बंद होणे हे ठरलेले टप्पे आहेत, हे मी आसपास पाहून व गेल्या वर्षांतील वृत्तपत्रांतील बातम्या वाचून निश्चित केलं आहे. माझे वय ८४ आहे. माझ्या हातात हृदयविकाराच्या पहिल्या हल्ल्यानंतर, जुलै १९९८ मध्ये काठी आली. त्यावेळी माझे वय ६६ होते. आजही माझ्या हातात काठी आहे. काठी हा माझा जास्तीचा अवयवच झाला आहे.
 
कोणीही मोठी व्यक्ति  निधन पावली व ती जर ८० या वयाच्या आसपासची असेल तर मी निधनाची ती बातमी, चार-सहा वर्तमानपत्रं हाताळून तपशील मिळवण्याकरिता वाचतो. वृद्धापकाळ, डायबेटीस, कर्करोग, हृदयविकार डेंगू अशा या ना त्या विकाराने ती व्य्नती निधन पावली ती बातमीत असते; पण बऱ्याच बातम्यांत, निधनापूर्वी ते घरी गुळगुळीत फरशीवरून बाथरूममध्ये किंवा रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पडले होते, फ्रॅक्टचर झालं होतं वगैरे पूर्व माहिती असतेच असते. माझ्या एका मित्राला भेटायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. माझे सर्व मित्र ऐशी वरचेच आहेत. घरातील कॉटवर झोपून, उठताना त्यांनी फ़क्त दोन-तीन इंच खाली उडी मारली होती. वर्षानुवर्षे ते अशीच उडी मारत.कारण कॉट तेवढी उंच होती. कॉटवर बसल्यावर त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते. प्रश्न तसा किरकोळ, म्हणजे दोन-तीन इंचाचाच होता! पण एका दिवशी ही किरकोळ उडी महागात पडली, फ्रक्टेर झालं. दुसरे एक मित्र घरीच साबणाच्या पाण्यानं घसरड्या झालेल्या खोलीतील गुळगुळीत फरशीवरून पडले, फ्रॅक्टचर झालं. फरशी घासणं, पुसणं, कोरडी होणं या क्रिया बाकी असताना आम्ही म्हातारी माणसं कॉटवरून, खुर्चीवरून खाली का उतरतो देव जाणे! बरं तसं कामही आम्हाला नसतं. आता खुर्चीवरून घसरणं हेच काम असेल तर बोलणंच खुंटलं! संध्या मॅडमनी मतोल सांभाळताना दिलेला इशारा ध्यानात घेऊन सोळावं वरीस धोक्याच  या चालीवर ऐशी हे वरीस धोक्याच असं आपण घोकलं पाहिजे.
 
काठी हातात घेतल्यानंतर म्हणजे १९९८ नंतर मी एकदाही पडलो नाही. उलट मी आत्मविश्वासाने खुरडतो. मी पडलो नाही. कारण अनोळखी ठिकाणी किंवा कमी प्रकाशात किंवा चढ- उतार करताना मी पाय पुढे न टाकता काठी पुढे टेकवून पाहतो. काठी मला सावध करते. काठीच्या मार्गदर्शनानुसार मी माझी मंद चाल अतिमंद करतो किंवा थांबतो. फूटपाथवरून चढ-उतार करताना मी काठीचा आधार तर घेतोच; वरती जवळपास कोणी तरुण असेल तर त्याची मदत मागतो. मुलुंडचे फूटपाथ काही ठिकाणी दीड-दीड फूट उंच आहेत. जिन्याच्या या तीन पायऱ्या झाल्या! बागेत फेऱ्या मारताना मात्र काठी टेकत नाही. अधांतरी, आडवी धरतो, कारण बागेतील चढ-उतार, उंचसखलपणा, दबलेल्या पेव्हरब्लॉकच्या जागा माझ्या परिचयाच्या आहेत. मुख्य म्हणजे बागेत वाहने नसतात! वेताची, वजनाने हलकी, अर्धवर्तुळाकार वेलांटीची काठी सोयीची आहे हे मला अनुभवातून समजले आहे. बँकेत वगैरे तर काठीची अर्धवर्तुळाकार कडी माझ्या मनगटावर अडकत
 
- भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४०