ती तुझ्याबरोबर नरकात ही सहचारिणी होईल का? मी इथं थांबतो, तू विचारून ये.फ वाल्याच्या पत्नीने परखडपणे सांगितलं, मनाही, मी तुमच्या पापात मुळीच वाटेकरी होणार नाही. वाल्याचे डोळे उघडले. तो नारदमुनींना शरण गेला. नारदमुनी म्हणाले, ममी सतत नारायणऽ नारायणऽ असं म्हणत असतो. तूही नामस्मरण कर. नामस्मरण तुला शुद्ध करेल.फ वाल्या म्हणाला, मना.. रा..य..ण..बाप रे! ही चार अक्षरे माझ्या जिभेवर कशी काय चढणार? मी लोकांना लुटताना, उन्मादाने मरा, मरा असं ओरडतो. हीच चार अक्षरं माझ्या ओळखीची आहेत. नारदमुनी म्हणाले, वा! चालेल, तू मरा मरा असाच जप कर. वाल्या कोळी मरा, मरा मनापासून म्हणत तपश्चर्या करत बसला.मरा, मराचं रूपांतर राम, राम मध्ये केव्हा झालं हे वाल्याला कळलंच नाही. वाल्या कोळीचे वाल्मीकी ऋषी झाले. वाल्या कोळीचे वाल्मीकी झाले, याचं खरं कारण वाल्या कोळ्याचा आतूनच दरोडेखोरी सोडायचा निश्चय झाला होता. मरा मराच राम झालं काय किंवा न झालं काय याला महत्त्व नाही.
काही माणसे सहजपणे खोटं बोलतात. असत्य त्यांच्या जिभेवर मुक्काम टाकून बसलेलं असतं. एक गृहस्थ देवळातील भगवद्गीतेची प्रत चोरून न्यायचे. पुजारीबुवांची अडचण व्हायची; कारण ते गीतेचा रोज एक अध्याय वाचायचे. त्यांना गीता हवी असायची. ते मुकाट नवी प्रत विकत आणायचे. काही दिवस जायचे आणि नवी प्रतही गायब व्हायची! पुजारीबुवांनी लक्ष ठेवलं व छडा लावला की अमुकतमुक गृहस्थ गीतेची प्रत चोरतात. त्यांनी त्या चोरगृहस्थांना थेट विचारलं, मही माझी गीतेची नवी प्रत. तीवर हात ठेवून शपथ घ्या की, मी तुमच्या गीतेच्या प्रती चोरत नाही.फ ते गृहस्थ उत्तरले, ममी तुमच्या एकाही प्रतीला हात लावला नाही. शपथ घेण्याकरता तरी मी तुमच्या गीतेला कशाला स्पर्श करू? कर नाही त्याला डर कशाला? मी घरी जातो आणि गीतेच्या दहा प्रती घेऊन येतो. दहा प्रतींवर हात ठेवून मी शपथ घेईन. या गृहस्थावर गीता काय संस्कार करील?
तुकाराम महाराज म्हणतात, जातीचे ते चढे प्रेम । शुक स्मरे राम राम । ते काय गुण लागते येरा । कागा शोभे न पिंजरा । (खरं प्रेम आतून मूळचं, अस्सल जातीचं हवं. म्हणून तर पोपट मराम रामफ म्हणायला शिकतो. कागा म्हणजे कावळ्याला शिकवून काही उपयोग नाही, पिंजरा फ्नत फुकट जाईल.) खरं ते आतूनही खरं असतं. खोटं किती काळ खपेल? कावळाही काळा आणि कोकिळ पक्षीही काळाच. मग दोघात तसा फरक काय? फरक तर आहेच, थोडं थांबा, काळ्या रंगाला फसू नका. वसंत ऋतू आला की समजेल की फ्नत कोकीळच कुहूऽ कुहूऽ हा गोड ध्वनी उच्चारतो. या अर्थाचं खालील सुभाषित आहे. काक: कृष्ण: पिक: कृष्ण: क: भेद: पिककाकयो: ।वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ।तुकोबांच्या वरील अभंगातील पुढच्या दोन ओळी अशा आहेत. मशिकवले जे सुजा शोषी । मग मोल चढे त्यासी ।तुका म्हणे वेषधारी । हिजड्या न होती नारी । (आतून चांगली प्रवृत्ती असेल तरच शिकवलेलं आत्मसात होईल व मोल वाढेल, तृतीयपंथी व्य्नती साडी नेसेल म्हणून ती स्त्री थोडीच होईल?)।(क्रमश:)