नानांचं एकाकीपण (भाग २ )

    02-Apr-2020   
Total Views |
 
nana_1  H x W:
 
आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.
 
नानांचं एकाकीपण
 
नाना दिवसातून दोन-तीन वेळा चुकून बटन प्रेस करतात, तेव्हाही घंटा वाजतात.' नानांना ब्लॉकभर हिंडावं वाटलं तर वॉकर आहे. केअरटेकर सकाळी ८ ते रात्री ८ असते. नोकरीसाठी घरचे चारही जण घराबाहेर असतात, पण नाना एकटे नसतात, केअरटेकर बाई असतात. लादी पुसणाऱ्या, भांडी घासणाऱ्या, कपडे धुणाऱ्या, पोळ्या करणाऱ्या कामवाल्या स्त्रिया त्यांच्या त्यांच्या वेळी येतात.
 
'आलात की आणि जाताना, नानांची चौकशी न विसरता करायचीच हे मी सर्वांना सांगून ठेवलं आहे.' ही माहिती मला नानांच्या सूनबाईंनी दिली. नानांना एकटे गाठून हलक्या आवाजात मी नानांना विचारलं, 'तुम्हाला घरची मंडळी एकटं पाडतात म्हणजे काय करतात?' नाना उत्तरले, 'आज रविवार आहे, म्हणून सारे घरी आहेत. एरवी रोज नोकरीच्या नावाखाली चारही जण घराबाहेर जातात, मी एकटा पडतो त्याचं काय?' नानांचे चिरंजीव, सूनबाई सर्व मंडळी आतिथ्यशील होती. पोहे, शिरा, चहा, बिस्किटं हे पदार्थ भरपूर आणि रूचकर होते. मुख्य म्हणजे साजूक तुपातील, बदाम-बेदाणे घातलेला गोड शिरा मला विशेष आवडला. परतताना मी परबांना विचारलं, 'नानांप्रमाणे मलाही एकाकी, सुखात पिचत पडायचं आहे. त्यासाठी किती शेकडा विठ्ठल, विठ्ठल म्हणावं लागेल?' कधी नव्हे ते संत परब संतापले, 'अधमाचे चित्त, अहंकारी मन । उपदेश शीण तया केला ।। तुका म्हणे तेसे अभाविका सांगता । उगाचि चित्ता शीण होय ।।' अखंड करावयाचे विठ्ठलनाम, मी शेकड्यात मोजले याचा परबांना राग आला असावा. परबांचा तोल गेला. परबांना हे शोभणारे नाही. विठ्ठला, परबांना क्षमा कर. 'अधम, अहंकारी मनाचा' हे अपशब्द मला उगाचच ऐकावे लागले. एकूण माझा दिवस बरा गेला नाही. साजूक तुपातील, बदाम-बेदाणे घातलेला गोड शिरा हीच काय ती उपलब्धी ठरली. नानांचे सुखाचे एकाकीपण माझ्या दैवात नाही!

निवडणूक
 
आमच्या वयोवृद्धांच्या मविरंगुळाफ मंडळातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. नव्या पदाधिकाऱ्यांकरिता निवडणूक होणार हे जाहीर झाले. 'विरंगुळा' मंडळावर कब्जा करावा, कॅरम-रमी-ब्रिज अशा खेळांचे अड्डे वाढवावेत व म्हातारपणाला मारक असे भाषणांचे रटाळ बैठे, सांस्कृतिक कार्यक्रम कायमचे रद्द करावेत, असे मला नेहमी वाटे. मी दोन-चार वेळा तसे बोलूनही दाखवले. प्रत्येक वेळी मला ऐकावे लागले, 'मोकाशी, परबांचे मित्र म्हणवता व असले भलते विचार बोलता? सांभाळा, स्वत:ला सांभाळा.'
 
माझे विठ्ठलभक्त यांचा, त्यांच्या संत प्रवृत्तीमुळे 'विरंगुळा'त दबदबा आहे. मी विचार केला की, आपण परबांना अध्यक्षपदी बसवावे. परब सहज निवडून येतील. परबांना ऐहिक व्यवहारात काहीही कळत नाही. परबांच्या नावावर आपणच कारभार करायचा. आपण हायकमांड व्हायचे. मी कधीही निवडणूक लढवत नाही. पदाचा लोभी मी नाही असे सांगून जागरूक व दक्ष सभासद राहणे मला आवडते. संधी मिळताच न झालेल्या कामांबद्दल व केलेल्या कामांतील चुकांबद्दल अध्यक्ष, कार्यवाह व खजिनदार यांना मी भर सभेत फैलावर घेतो. एका पत्रकात 'शनिवार' हा शब्द 'शनीवार' असा छापला होता. हस्व 'नि व दीर्घ 'नी' यातील फरक मी नीट समजून घेतला. ओक नेहमी म्हणत, 'ज्ञानेश्वर ते कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेबाबत आपण दक्ष राहिलं पाहिजे.' त्यामुळे ज्ञानेश्वर व कुसुमाग्रज ही नावे मला पाठ झाली होती