एक विठ्ठल आधार!

    17-Apr-2020   
Total Views |

mnb_1  H x W: 0 
 
ओक नुसते हसले. थोडा वेळ ओक व शरयू बोलले. मी ऐकत होतो. बोलण्यातून समजलं की, शरयू संत आता सौ. शरयू खांबेटे आहेत. त्यांची नात व तिचा नवरा मुलुंडमध्ये स्थायिक झाले आहेत म्हणून शरयू चार दिवसांसाठी आली आहे. उद्या मी सातारला परतणार आहे. खांबेटे घरी एकटे आहेत. परतताना ओकांनी मला विचारलं, ममोकाशी, शरयूनं तुम्हाला विचारलेला कार-बंगल्याचा प्रश्न मला बोचरा वाटला. शरयूनं असा प्रश्न का विचारावा? मला तो अयोग्य वाटला. या प्रश्नाचा शाळेतील दिवसांशी काही संबंध आहे का?फ शरयूचा प्रश्न मला काट्याप्रमाणे रुतला होता. ओकांच्या बोलण्यात मला सहानभुतीचा ओलावा दिसला. मी फसलो. मी सांगू लागलो, मओक, शाळेनं अकरावीच्या आपणा विद्यार्थ्यांना  सेंड ऑफ दिला. मी त्या शेवटच्या दिवशी शरयूजवळ माझं प्रेम व्यक्त केल . मी म्हणालो, तू खूप देखणी आहेस. तुझे वडील डॉक्टर  आहेत. तुमचा बंगला आहे. आम्ही परिस्थितीनं सामान्य आहोत. तू माझ्याशी आज लग्न कर, असं म्हणणार नाही. मात्र तू मला थोडा वेळ दे. मी कर्तबगार आहे. मी शिक्षण पूर्ण करीन, बंगला बांधीन, कार विकत घेईन व करमध्ये बसून तुला मागणी घालायला येईन.
 
तू माझी वाट पाहा. ओक, त्यावर शरयू नुसतं हसली. काहीच बोलली नाही. पुढं तिनं सातारच्या लष्करात नोकरी करणाऱ्या कोणा मेजरशी विवाह केला. माझ्या स्वप्नांचा च्नकाचूर झाला. बंगला बांधणं, मोटार विकत घेणं यात मला काहीही रूची उरली नाही. माझ्यासारख्या कर्तबगार व्यक्तीच्या  मनाचं उद्यान शरयूनं उद्ध्वस्त केलं. तरीही शाळेतील मैत्रीपोटी मी तुम्हाला घेऊन तिला भेटायला गेलो. शरयूनं काय केलं? तिनं मला डिवचणारा प्रश्न विचारला! मी पाचशे चौरस फुटांच्या ब्लॉकमध्ये राहतो आणि माझ्याकडे स्कूटरही नाही ही बातमी तिच्यापङ्र्मंत पोहोचली असणार!फ ओक गप्प राहिले, मी बंगला का बांधला नाही याबाबत मी केलेला खुलासा ओकांना पटला नसणार! ओकांना अडचणीत आणण्याकरिता मी मुद्दाम विचारलं, शरयू संस्कृतात तुमच्याशी काहीतरी बोलली तुम्ही शिकवलेले दोन श्लोक कृतज्ञतेने आठवते, असं ती म्हणाली. या दोन श्लोकांची काय गोम आहे? मोकाशी अण्णा संत माझ्या वडिलांना म्हणाले, तुमच्या मुलाचं संस्कृत चांगलं आहे, असं शरयू म्हणत होती. तुमचे चिरंजीव शरयूला संस्कृत शिकवतील का? बाबांनी मला शरयूबरोबर संस्कृतचा अभ्यास कर म्हणून सांगितलं.
 
एकत्र अभ्यास करता करता शरयू माझ्यात गुंतते आहे हे ध्यानी आलं. मी शरयूला समजावलं, मतुझ्या वडिलांचा व माझ्या वडिलांचा आपणा दोघांवर विश्वास आहे. आपण फ्नत संस्कृतच शिकू, प्रेम वगैरे काही करणार नाही. तू श्रीमंत आहेस, रूपवती आहेस. तुझ्या आईवडिलांच्या जावयाविषयी काही अपेक्षा आहेत. मी त्यामध्ये बसणार नाही. मी माझी पात्रता ओळखतो. मी काच आहे, तू रत्न आहेस. चमकदारपणा हे बाह्य लक्षणच काय ते दोहोंत समान आहे, प्रत्यक्षात मकाच: काच: मणि: मणि: । हे सत्य आहे. माणिक हे श्रेष्ठ रत्न आहे, ते हलक्या  किमतीचं तांबे- पितळेचे कोंदण थोडंच स्वीकारतं? अनर्घ्याम  अपि माण्नियम् हेमाश्रयम् अपेक्षते । माणिक हीन कोंदण स्वीकारत नाही, कोंदणाकरिता त्याला सोनंच हवं असतं. ओक व मी परबांजवळ आलो. काही न बोलता मी, माझ्या लायकीची माझी पिशवी परबांकडून घेतली. परब विठ्ठलऽ विठ्ठलऽ म्हणाले, मीही म्हणालो. मला आज विठ्ठलाचा आधार हवा होता, ममाझं व्यंग जाणणाऱ्याफ ओकांचा नको होता. .
 (क्रमश:)
- भा. ल. महाबळ फोन :
०२२-२१६३१९४०