व्यायामातून खुलवा व्य्नितमत्त्व

    19-Apr-2024
Total Views |
 
 
 

health 
सध्याच्या आधुनिक काळात शारीरिक व्यायाम फारच कमी झालेला आहे .त्यामुळे शरीराला पुरेसा सराव मिळत नाही. प्राणायाम, सूर्यनमस्कार, याेगासने कवायतीचे प्रकार, सायकल चालवणे, पायी फिरणे, टेकडी चढणे यापैकी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार नियमित पणे केले गेले पाहिजे.काही अंतर पायी चालत जाण्याचा नियमच बनवून घेतला तर फारच उत्तम. या सर्व बाबींचा व्य्नितमत्त्व विकासात माेलाचा वाटा असताे हे लक्षात घेतले पाहिजे. चपळ हालचाली करता येणे व वेगवान पद्धतीने प्रतिक्रिया देता येणे हा देखील व्यक्तिमत्त्व विकासासाठीअत्यंत महत्त्वाचा गुण आहे. कबड्डी, खाे-खाे, रनिंग, क्रिकेट या सारख्या सर्वच खेळांमध्ये वेगवान आणि चपळ हालचाली करणे गरजेचे असते. विविध खेळांतील नामवंत खेळाडू आपण बघितले, तर त्यांच्या अंगी चपळ हालचाली करण्याची क्षमता हाेती. त्यामुळे ते यशस्वी झाले. वेगवान हालचाली करता येण्यासाठी किंवा ताकद वापरता येण्यासाठी आपल्या स्नायूंमध्ये व अवयवांमध्ये लवचिकता असणे सुद्धा गरजेचे आहे.
 
वाकून उभे राहणे, ओणवे उभे राहणे या सर्वांसाठी शरीरामध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे. लवचिकता नसेल, तर आपल्या हालचालींना मर्यादा पडतात. शारीरिक हालचाली पटकन करण्याची क्षमता म्हणजे लवचिकता हाेय. कबड्डी, गायनकला, सायकलिंग, रनिंग इत्यादींमध्ये दमश्वासावरील नियंत्रणाला महत्त्व असते.आपल्याला काेणतीही कृती करायची असेल, तर आपल्या ज्ञानेंद्रियामध्ये आणि स्नायूंमध्ये याेग्य ताे समन्वय असणे गरजेचे आहे. आपली ज्ञानेंद्रिये स्नायूंना आज्ञा देतात व त्यानंतरच स्नायू कृती करतात. त्यामुळे स्नायू आणि ज्ञानेंद्रियांच्यामध्ये समन्वय व्यवस्थित असला, तर काेणतीही कृती सफाईदारपणे हाेते. उत्तम शरीरसंपत्तीसाठी काय करता येईल याचा नेहमी प्राधान्याने विचार केला पाहिजे. शारीरिक स्वच्छता नसेल, तर शरीर संपदाही राहणार नाही. केस, हात, डाेळे, जीभ, नखे या सगळ्यांची नियमितपणे स्वच्छता राखली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेचेही आपण भान ठेवायला हवे. शरीराला सर्व पाेषक घटक मिळतील असा संतुलित आहार आपण घेतला पाहिजे. आहार पचण्यासाठी हलका असावा.तसेच फास्ट फूड, शीतपेय जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.