अमर हवा तिथे अमरच हवा!

    27-Mar-2024
Total Views |
 
 
 

Amar 
एखाद्या गाण्यातलं एखादं वाद्य फार बेहतरीन वाजतं.पण, ते काेणी वाजवलं आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतात ‘इक प्यार का नगमा है’ या गाण्याचा अपवाद वगळता (तिथे वादक हाेते जेरी फर्नांडिस) बाकी सगळे साेलाे व्हायाेलिन पीस एका मराठी वादकाने वाजवलेले आहेत. अमर हळदीपूर हे त्यांचं नाव. अमर हे स्वत: संगीतकार. अमिताभ बच्चनच्या शहेनशहाला संगीत देणाऱ्या अमर-उत्पल या जाेडीत ते हाेते. ते इंडस्ट्रीतले नामवंत व्हायाेलिन वादक. कर्ज सिनेमातल्या दर्द ए दिल, दर्द ए जिगर या गाण्यात साेलाे व्हायाेलिनचा पीस अमर वाजवतील, असं ठरलं हाेतं. मात्र, त्याच वेळी आरडी बर्मनचं रेकाॅर्डिंग हाेतं.
 
तिथे अमर यांना उशीर झाला. त्यांच्या जागी काेणी वेगळा वादक बाेलावून काम मारून नेण्याचा मार्ग एलपींनी स्वीकारला नाही.
त्यांनी अमर यांची तीन तास वाट पाहिली आणि गायकाच्या माइकसमाेर वादकाला उभं राहण्याची जागा नाही म्हटल्यावर अमर यांच्यासाठी स्वतंत्र माइकचीही व्यवस्था केली. खुदा गवाहच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये अफगाणी ढंगाने व्हायाेलिन वाजवण्यासाठी तर अमर यांना शहेनशाहचं गाणं साेडून धावावं लागलं हाेतं, कारण खुद्द अमिताभने फाेन करून सांगितलं हाेतं की, हे काम फक्त तुम्हीच करू शकता, असं मला एलपींनी सांगितलं आहे.