परीक्षेच्या काळात उपयुक्त व्यायाम

    19-Mar-2024
Total Views |
 
 
 

Exercise 
 
व्यायाम एराेबिक:
 
व्यायाम एराेबिक व्हायला पाहिजे.कार्डिओव्हॅस्क्युलर ज्यात हृदयाच्या गतीसाेबत श्वसनाची गतीही वाढते.व्यायाम करताना त्या व्यायामामुळे हृदय साधारण गतीपासून जाेरजाेरात धडधडायला हवे. एवढ्या मेहनतीचा व्यायाम असावा. ही स्थिती कमीत कमी पाच मिनिटे कायम राहायला हवी. त्यानंतरच बी.एम.आर.ची पातळी वाढते. ताे जर 10 ते12 मिनिटे कायम राहिला तर अधिक चांगले.परंतु तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. परंतु जड आणि धावपळीचा व्यायाम टाळा कारण असा व्यायामुळे मांसपेशींना थकवा येताे. त्याला एराेबिक एक्सरसाइज असे म्हटले जाते. त्या काळात पेशींमध्ये माेठ्या प्रमाणावर लॅक्टिक अ‍ॅसिड तयार हाेते.त्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा पेशी अधिक रक्ताची मागणी करतात. हे रक्त मेंदूकडे जाणाऱ्या पुरवठ्याला विराेध करते.
 
व्यायामाचा आदर्श कार्यक्रम काय असावा?
 
जे लाेक काहीही व्यायाम करत नाही किंवा करू शकतात त्यांच्यासाठी अगदी सहजपणे व्यायाम करता येईल असा पर्याय आहे.
किती व्यायाम करावा? हे तर प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. एखादा बाॅडी बिल्डरला राेज 100 बैठका मारूनही थकवा जाणवत नाही परंतु बैठे काम करणाऱ्याला 15- 20 मिनिटांत थकून जाताे. त्यामुळे अशा व्यक्तीने थकण्यापूर्वीच व्यायाम थांबविला पाहिजे. त्यामुळे 10 मिनिटे धावणे, किंवा 20 मिनिटे वेगाने चालणे अशा प्रकारचे हलके व्यायाम करावा.
 
सकाळी
 
सकाळच्या वेळी थाेडासा याेगा किंवा प्राणायाम करणे चांगले राहील.त्यात काही एराेबिक व्यायाम असावा.उभ्याउभ्यानेच जागेवर धावणे.जागेवरच 100 उड्या मारणे. हा व्यायाम आपल्या रक्त संचरणाची गती वाढवून आपल्या शरीरातील मांसपेशींना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा करताे.
 
संध्याकाळी
 
या वेळच्या बी.एम.आर. ची पातळी कमी असते. या स्थितीचे आकलन हाेण्यासाठीच आपण इव्हिनिंग न्यूज किंवा इव्हिनिंग अ‍ॅक्टिव्हिटीज असे शब्दप्रयाेग वापरताे. आपल्या शरीराची पचनशक्ती वाढविण्यासाठी 10 मिनिटे चालणे किंवा शतपावली करणे चांगले असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहाची गती वाढते.तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच अशा प्रकारच्या चालण्याचा व्यायाम करावा. काही लाेकांना रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्याची रसवय असते. अशा लाेकांनी कमीतकमी 20 मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करावा. कारण रात्रीच्या वेळी आपल्या आतड्यांना जेवण पचविण्यासाठी अधिक रक्ताची गरज असते. त्यामुळे मानसिकरित्या तुम्हाला थाेडेसे आळसावल्यासारखे वाटते. त्यामुळे जर रात्री जेवल्यानंतर थाेडे िफरले तर पचन सुधारते.