दाेन्ही हात गमावलेले असूनही, जिद्दी आमीर लाेन झाला क्रिकेट संघाचा कप्तान

    17-Mar-2024
Total Views |
 
 
 

cricket 
मनात जिद्द असेल, तर काहीही अश्नय नसल्याचे आमीर हुसेन लाेन या तरुणाकडे पाहिल्यावर कळते.अनंतनागजवळून वाहणाऱ्या झेलम नदीवरील पूल ओलांडल्यावर एक रस्ता डावीकडे जाताे. त्यावरून दहा किलाेमीटर गेल्यावर आपण पाेहाेचताे गुराखी आणि सफरचंदाच्या बागाईतदारांच्या वाघमा या गावात. हे गाव तुम्हाला भूगाेलाच्या पुस्तकात सापडले नाही, तरी येथील एका जिद्दी तरुणाने केवळ प्रसिद्धी माध्यमेच नव्हे, तर सचिन तेंडुलकरचे लक्षही वेधून घेतले आहे. आमीर हुसेन लाेन हे या तरुणाचे नाव आणि त्याला दाेन्ही हात नाहीत.भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट काेहली याने 2016मध्ये केलेल्या एका ट्विटमुळे त्याचे नाव प्रथम समाेर आले. नंतर सदिच्छेचे प्रतीक म्हणून सचिन तेंडुलकरने आमीरला एक बॅट भेट दिली. सचिन आणि त्याची प्रत्यक्ष भेट हाेण्यास मात्र पुढे आठ वर्षांचा काळ गेला.
 
बशीर अहमद लाेन आणि राजा बेगम यांच्या चार अपत्यांत आमीर दुसरा. ताे आठ वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याच्या माेठ्या भावासाठी जेवणाचा डबा घेऊन त्याला वर्कशाॅपमध्ये पाठविले. तिकडे जाताना आमीरने त्याच्या वडिलांनी दिल्लीहून आणलेले नवे जॅकेट घातले हाेते. ‘भावाला डबा देऊन मी जवळच असलेल्या यांत्रिक करवतीजवळ (बॅण्डसाॅ) खेळत असताना माझे जॅकेट यंत्रात अडकून मी खेचला गेलाे आणि धारदार करवतीने माझे दाेन्ही हात कापले गेले,’ असे आता 34 वर्षांचा आमीर सांगताे. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी कार आणली गेली. पण, त्यांना रस्त्यातच साेडून ड्रायव्हर निघून गेला.मात्र, लष्कराचे जवान लगेच मदतीला आले आणि त्याला रुग्णालयात आणले गेले. त्याच्या उपचारांसाठी वडिलांना ही यांत्रिक करवत आणि जमिनीचा एक तुकडा विकावा लागला.
 
हात गमावल्यामुळे पुढे काय, असा प्रश्न असलेल्या आमीरच्या पाठीशी त्याचे कुटुंबीय भक्कमपणे ऊभे राहिले. त्यात त्याची आजी फाजी बेगम या प्रमुख हाेत्या. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आमीर त्याचे दु:ख पचवायला शिकला. या दुर्घटनेनंतर ताे शाळेत जायला लागला तेव्हा शिक्षकांनी त्याला घरीच राहण्यास सांगितले. मात्र, शिक्षण घेण्यावर ताे ठाम हाेता. अभ्यासासाठी ताे अन्य विद्यार्थ्यांच्या नाेट्सर अवलंबून हाेता. एकदा एकाने त्याला नकार दिल्यावर आमीरने पायाने लेखन करण्याचा सराव सुरू केला आणि नंतर ताे परीक्षेचे पेपरही लिहू लागला. शाळा संपल्यावर ताे माेकळा हाेता.आजूबाजूची मुले क्रिकेट खेळताना, पाेहताना पाहून त्यालाही तसे करावेसे वाटत हाेते. एकदा त्याने पाण्यात उडीही घेतली. पण, ताे बुडायला लागला. मात्र, जवळच असलेल्या एका महिलेने त्याला बाहेर काढले.
 
कुतूहलजन्य स्वभावामुळे आमीरने बदके कशी पाेहतात याचे निरीक्षण केले,तेव्हा बाेटांना असलेल्या पातळ पडद्याचा वापर करून बदके पाण्यात तरंगत असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्यानेही पायांच्या मदतीने तसे तरंगण्याचा प्रयत्न सुरू केला आणि एक दिवस या पद्धतीने पाेहत पाेहत ताे झऱ्याच्या दुसऱ्या टाेकाला पाेहाेचला. तेव्हा मित्रांना आश्चर्य वाटले.या घटनेतून आमीरचा आत्मविश्वास वाढला आणि आपण क्रिकेट खेळावे अशी जिद्द त्याच्या मनात निर्माण झाली. क्रिकेटच्या सरावासाठी बॅट आवश्यक हाेती. फावडे वापरून त्याने ताे प्रश्न साेडविला आणि लाकडाचा एक तुकडा बाॅल म्हणून उपयाेगी पडला. आजीने बाेलरचे काम सुरू केल्यावर आमीर त्याची फावड्याची ‘बॅट’ एखाद्या व्हायाेलिनप्रमाणे हनुवटीखाली धरून ‘बॅटिंग’ करायला लागला.
 
प्रारंभी त्याला काही जमले नाही, तरी सततच्या सरावाने ताे उत्तम खेळायला लागला. नंतर पायांचा वापर करून काडी पेटवून स्टाेव्ह पेटविण्यासही ताे शिकला. त्याचा फायदा म्हणजे, घरी एकटा असतानाही आमीर त्याचजेवण आणि चहा स्वत: बनवू शकताे. शालेय शिक्षण संपल्यावर त्याने अनंतनागजवळच्या बिजबेहरा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला.त्याच्या मित्रांनी उत्तेजन दिल्यामुळे त्याने सरकारी नाेकरीसाठी अर्जही केला, पण ताे नाकारला गेला.पायांनी लॅपटाॅप वापरण्याचे काैशल्य असूनही मुलाखत घेणाऱ्यांनी त्याला सेवेत घेण्यास नकार दिला. काॅलेजमध्ये क्रिकेट खेळणारी मुले पाहून आमीर नाेकरीतील नकाराचे दु:ख विसरला आणि त्यांच्यासाेबत खेळायला लागला. त्याचे टे्निनक पाहून त्या मुलांनी त्याला पॅरा-क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. त्याची संघात निवडही झाली. मात्र, काॅलेजमध्ये ट्रॅक पँट न वापरता फाॅर्मल ट्राउजर वापरण्याची सक्ती हाेती.
 
प्राचार्यांनी त्याचे काहीही ऐकले नाही. मात्र, जिद्द न साेडता आमीर खेळत राहिला आणि 2015मध्ये ताे जम्मू-काश्मीरच्या संघाचा कप्तान झाला. त्यांच्या संघाला दिल्लीत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, पहिल्याच मॅचपूर्वी आमीरपुढे दाढी करण्याचा प्रश्न आला. त्याने दाढीचे किट आणले नसल्यामुळे त्याने शेजारच्या खाेलीतील खेळाडूला त्याचे किट देण्याची विनंती केली तेव्हा, ‘तू पायांनी दाढी केलीस, तर मी तुला माझे किट बक्षीस देईन,’ असे ताे म्हणाला.जिद्दी आमीरने तेही केल्यावर मात्र त्या खेळाडूने त्याला आलिंगन देऊन काैतुक केले आणि त्याचे दाढीचे किटही देऊन टाकले. केरळच्या संघाबराेबर झालेल्या सामन्यात आमीरने 25 धावा काढल्याने जम्मू-काश्मीरचा संघ जिंकला. पण, त्याचे काैशल्य पाहून पराभूत झालेल्या केरळच्या खेळाडूंनीही खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली, हे विशेष.आमीर आता प्रसिद्ध हाेऊ लागला हाेता.
 
त्याचे व्हिडिओ फिरायला लागले. ‘नॅशनल मेन्स टीम’पर्यंत ते पाेहाेचले. भारतातील 2016च्या टी20 वर्ल्ड कपच्या वेळी आमीरचे आयुष्य बदलणारा एक काॅल आला. माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने ताे केला हाेता. प्रथम आमीरला ताे बनावट काॅल वाटला. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील सेमी फायनल सामन्याचे निमंत्रण जडेजाने दिल्यामुळे आमीर हा रखून गेला. मुंबईला पाेहाेचल्यावर त्याचे जडेजाबराेबर बाेलणे झाले तेव्हा आपल्या या दाैऱ्याचा खर्च आशिष नेहरा याने केल्याचआमीरला समजले. मात्र, या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यावर विराट काेहलीने ट्विट करून आमीरसारखे जिद्दी खेळाडून हवेत, असे मत व्यक्त केले. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि आकाश चाेप्रा यांनीही आमीरबाबत ट्विट केले. याच दरम्यान आमीरच्या जिद्दीची प्रशंसा करून सचिन तेंडुलकरने त्याला एक बॅट भेट म्हणून पाठविली.
 
नंतर आठ वर्षांनी सचिन काश्मीरमध्ये असताना त्याने आमीरला त्याच्या हाॅटेलवर येण्याचे निमंत्रण दिले. ‘माझा हिराे असलेल्या सचिन तेंडुलकरला भेटण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. त्याने मला त्याच्या सहीची बॅट भेट दिली आणि मी अश्नय ते श्नय केले, अशा शब्दांत माझी प्रशंसा केली. माझ्या या हिराेबराेबरचा एक तास कसा गेला, हे समजलेच नाही,’ अशा शब्दांत आमीर त्याचा आनंद व्यक्त करताे.केवळ भारतातील नव्हे, तर अफगाणिस्तान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातींमधील सामन्यांतही आमीर खेळला आहे. आता मात्र क्रिकेटचा छंद आणि ‘बाबां’ची ड्यूटी अशा दाेन आघाड्या त्याला सांभाळाव्या लागत आहेत.2018मध्ये त्याचा विवाह झाला आणि इमाद नावाचा मुलगा त्याला आहे.