पृथ्वीतलावरील अमृत : मठ्ठा

    14-Mar-2024
Total Views |
 
 
 

Mattha 
 
जसा स्वर्गातील देवांना अमृतपान करून सुख आणि आनंद मिळत असताे तसाच पृथ्वीवर माणसाला मठ्ठा प्यायल्यामुळे आराेग्य सुख प्राप्त हाेते व हे प्यायल्यामुळे नष्ट झालेल्या राेगांची पुनरावृत्ती हाेत नसते.ज्या ज्या प्राण्यांचे दूध प्याले जाते व ज्यांच्या दुधाचे दही बनवले जाते त्या सर्वांपासून मठ्ठा तयार करता येऊ शकताे.यामध्ये गाय, म्हैस, शेळी, बकरी इ. सर्वांत जास्त उपयुक्त असतात. मठ्ठ्याची प्रकृती बरीचशी दह्यावर अवलंबून असते.
 
 पूर्णपणे न विरजता बनवलेल्या दह्यापासून जाे मठ्ठा तयार केला जाताे, ताे बद्धकाेष्ठता नाशक, त्रिदाेषनाशक व पाेटातील विकारांचा नाश करणारा असताे.
 
 पूर्णपणे विरजलेल्या दह्यापासून बनवलेला मठ्ठा वीर्यवर्धक, कफकारक, वायुनाशक व रक्तासाठी गुणकारी असताे.
राेगांचा नाश
 अशक्त प्लिहा वा पांथरी असणाऱ्या व अशक्त रुग्णांसाठी मठ्ठा पिणे गुणकारी असते. ते राेगापासून रुग्णास दिलासा देते.
 लहान मुलांना राेज थाेडासा गाेड व ताजा मठ्ठा पाजल्यास त्यांचे दात सहजतेने येतात.
 मठ्ठा प्यायल्याने लिव्हरमधील वेदना नाहीशा हाेतात.
 मठ्ठा स्थूलता कमी करण्याचा अद्भुत उपाय आहे. त्यासाठी राेज एक ग्लास लाेणी काढलेला मठ्ठा प्यायला हवा.
 जड, तळकट तेलकट व तिखट खाद्यपदार्थ मठ्ठा पिऊन पचवता येऊ शकतात.
 मठ्ठा काही दिवस पित राहिल्यास बद्धकाेष्ठतेत फायदा हाेताे. यामुळे शाैचास साफ हाेते आणि पचनक्रियाही सुधारते.
 त्वचेसंबंधित सर्व राेगांचे निवारण मठ्ठा वापरून करता येते. ते रक्त शुद्ध करते व दूषित मल बाहेर काढते.
 रक्तदाबात लकवा वा हृदयाघाताची चिंता सतावत असते. अशावेळी लाेणी काढलेला मठ्ठा राेज प्याल्यास फायदा हाेताे.रक्तदाब सामान्य हाेताे. रक्तशुद्धी हाेते आणि धमन्यांमध्ये व शिरांमध्ये लवचिकता येते.
 लाेणी काढलेला मठ्ठा दम्याच्या रुग्णांसाठी वरदान आहे. मठ्ठ्यात जिरे, काळी मिरी आणि मीठ मिसळून प्यायल्यास खूप फायदा हाेताे.
 नियमित मठ्ठा पिणारे मद्यापासून दूर राहतात.
 मुरड्यासारख्या पचनक्रियेच्या त्रासदायक राेगांमध्ये ताकाच्या द्रावणाचा एनिमाही देतात. द्रावण माेठ्या आतड्यात सरकवून काही काळ राेखून धरल्यास आतील सफाई हाेते व रुग्णास नवजीवन मिळते.