‘मेड बाय इंडियन्स’ अशी ओळख निर्माण करावी : राज्यपाल

    08-Sep-2023
Total Views |
 
 
 

india 
जपान व जर्मनीत नाेकरी करण्यासाठी संधी मिळालेले आयटीआयचे विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची एक वेगळी ओळख करून देतील. ‘मेड इन जर्मनी’ आणि ‘मेड इन जपान’ हे शब्द जसे त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि सेवांची ओळख करून देतात, त्याच प्रकारे आपलीही ‘मेड बाय इंडियन्स’ अशी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.सह्याद्री अतिथिगृहात काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नावीन्यता विभागाच्या राज्य काैशल्य विकास साेसायटीअंतर्गत ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय राेजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन आणि परदेशात राेजगार प्राप्त आयटीआयमधील 58 विद्यार्थ्यांचा सत्कार करताना राज्यपाल बाेलत हाेते.
 
यावेळी काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लाेढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राेजगार, उद्याेजकता व नावीन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, राज्य काैशल्य विकास साेसायटीचे आयुक्त रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, काैशल्य विकास विद्यापीठाच्यकुलगुरू अपूर्वा पालकर, ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण काेरिया, थायलंड आणि इतर प्रमुख देशांचे वाणिज्यदूत उपस्थित हाेते.
 
जपान, जर्मनी अशा देशांच्या कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून राज्यातील युवकांना आवश्यक काैशल्य प्रदान करण्यासाठी या सुविधा केंद्रामार्फत लाभ हाेणार आहे. राज्यात पाच ठिकाणी या केंद्राच्या शाखा स्थापन करण्यात येतील. या केंद्राच्या माध्यमातून राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देता येतील, असे लाेढा यांनी सांगितले. केसरकर यांनीही मनाेगत व्यक्त केले. जर्मनी व जपानमध्ये नाेकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.दळवी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.